शिवप्रहार न्यूज - बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने वृद्धाचा मृत्यू;कोरोना रिपोर्ट आला पॉझिटिव्ह...

शिवप्रहार न्यूज - बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने वृद्धाचा मृत्यू;कोरोना रिपोर्ट आला पॉझिटिव्ह...

बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने वृद्धाचा मृत्यू;कोरोना रिपोर्ट आला पॉझिटिव्ह...


श्रीरामपूर - श्रीरामपूर एमआयडीसीला लागून असलेल्या रांजणखोल या गावात राहणारे महादेव शंकर अभंग,वय 75 हे बाथरूम मध्ये पडल्यामुळे जखमी झाले होते. 
        त्यामुळे त्यांना उपचार कामी साईबाबा हॉस्पिटल,शिर्डी येथे दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी ते मयत असल्याचे कळवले आणि त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे देखील सांगितले. 
        या प्रकरणावरून सर्व कागदपत्र श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू नोंद क्रमांक 68/2021 प्रमाणे घेण्यात आली असून त्याचा पुढील तपास पोलिस नाईक राशिनकर हे करीत आहेत.