शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात 09 वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार...

श्रीरामपुरात 09 वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर शहराजवळील पश्चिम दिशेला असलेल्या एका गावात काल मंगळवारी शाळेत चाललेल्या 9 वर्षीय मुलीला 59 वर्षीय नराधम संजय दगडू गांगुर्डे याने काटवनात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. सदरची घटना पीडित मुलीने आपल्या आईला सांगितल्यानंतर उघडकीस आली.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसात लैंगिक अत्याचार करणारा नराधम संजय दगडू गांगुर्डे (वय- 59) याच्याविरुद्ध पोक्सोसह भारतीय न्याय संहिता कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या कडून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली असून आज बुधवारी दुपारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.