शिवप्रहार न्युज - श्रीरामूपर शहर पोलीस स्टेशनतर्फे तरुणांना नशामुक्तीबाबत समुपदेशन….

श्रीरामूपर शहर पोलीस स्टेशनतर्फे तरुणांना नशामुक्तीबाबत समुपदेशन….
श्रीरामपूर- " नशा ही केवळ वैयक्तिक नाही तर सामाजिक समस्या बनली आहे. त्यामुळेच समाजाच्या प्रत्येक घटकाने या लढयात सहभागी होणे आवश्यक आहे. व्यसनमुक्तीसाठी उपचार प्रक्रियेबरोबरच मानिसक आधारही तितकाच गरजेचा आहे. समुपदेशना दरम्यान तरुणांना दिलेला विश्वास, समजुतदारपणा आणि सकारात्क दृष्टीकोन यामुळे व्यसनातून मुक्त होण्यास फारच मदत होते." हिच भावना मनात ठेवुन तरुणांना नशेपासुन दुर ठेवण्यासाठी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे , मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली नशामुक्ती समुपदेशन कार्यक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रमाकरीता श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे शंभर ते दिडशे व्यसनाधीन तरुण व त्याचे पालक तसेच सामाजिक कार्यकर्ते हजर होते. सदर तरुणांना पोलीस निरीक्षक नितीन देशमुख,सहाय्यक पोलीस निरीक्षक / गणेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक / रोहिदास ठोंबरे, पोलीस उपनिरीक्षक /समाधान सोळंके, पोलीस उपनिरीक्षक / रोशन निकम यांनी तंबाखु, गुटखा, दारु, गांजा व अंमलीपदार्थापासून होणारे तोटे, त्यांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम, तरुणांना सांगुन नशेपासुन दुर राहण्याबाबत मार्गदर्शन केले व सदर तरुणांकडुन कोणत्याही प्रकारची नशा करणार नाहीत याबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली.