शिवप्रहार न्युज - कॅफेच्या नावाखाली तरूणांना अश्लील चाळे करण्यास जागा उपलब्ध करुन देणा-या 5 कॅफे चालकांविरुध्द कारवाई

कॅफेच्या नावाखाली तरूणांना अश्लील चाळे करण्यास जागा उपलब्ध करुन देणा-या 5 कॅफे चालकांविरुध्द कारवाई
नगर-या बाबत अधिक माहिती अशी की,मा. श्री.राकेश ओला,पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना अहिल्यानगर शहरातील कॅफेची तपासणी करुन कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/तुषार धाकराव व पोलीस अंमलदार संदीप पवार, विश्वास बेरड, पंकज व्यवहारे, शाहीद शेख, गणेश धोत्रे, विजय ठोंबरे, शिवाजी ढाकणे, आकाश काळे, जालींदर माने, मयुर गायकवाड, भाग्यश्री भिटे, सारीका दरेकर, ज्योती शिंदे अशांचे पथक तयार करून अहिल्यानगर व भिंगार येथील कॅफेची तपासणी करून गैरप्रकार आढळल्यास कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले.
दि.29/04/2025 रोजी पथकाने कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील 1) नगर कल्याण रोडवरील द परफेक्ट कॅफे 2) सारसनगर ते वाकोडी जाणारे रोडलगत बेलाचाव कॅफे तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील 3) सावेडी गावातील पंपींग स्टेशनजवळील आँरिगेनो कॅफे 4) कोहिनूर मॉलजवळील झेडके कॅफे व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील 5) स्टेट बँक चौक, अहिल्यानगर येथील वननेस कॅफे अशा ठिकाणी पंचासमक्ष जावुन खात्री केली असता तरुण मुल मुली अश्लील चाळे करताना मिळुन आले.पथकाने वर नमूद कॅफे चालकास कॅफे चालविण्याचा परवाना बाबत विचारपुस करता त्यांनी कॉफी शॉपचा परवाना नसताना कॉफी शॉपचा बोर्ड लावुन कुठलीही कॉफी, पेय अगर खाद्यपदार्थ विक्रीस न ठेवता आतमध्ये मुलामुलींना बसण्यासाठी व अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे निष्पन्न झाले.
पथकाने कॅफे चालक नामे 1) महेश पोपट खराडे, वय 23, रा.नालेगाव, अहिल्यानगर (परफेक्ट कॅफे) 2) आसिफ आयाज शेख, वय 26, रा.भोसले आखाडा, बुरूडगाव, अहिल्यानगर 3) विशाल विष्णु वाघ, वय 18, रा.बुरूडगाव रोड, अहिल्यानगर 4) मंगेश भरत आजबे, वय 19, रा.बुरूडगाव रोड, अहिल्यानगर 5) महेश शंकर दरंदले, रा.चिपाडेमळा, अहिल्यानगर फरार (बेलाचाव कॅफे) 6) अविनाश विलास ताठे, वय 32, रा. ताठेनगर, सावेडी, अहिल्यानगर (ऑरिगेनो कॅफे) 7) मंगेश रमेश देठे, वय 19, रा. भगवती कोल्हार,ता.राहाता, जि.अहिल्यानगर 8) महेश सातपुते, रा.अहिल्यानगर फरार (झेडके कॅफे)9) कृष्णा अनिल कराळे, वय 19, रा.तपोवन रोड, ज्ञानसंपदा शाळेच्या पाठीमागे, अहिल्यानगर (वननेस कॅफे) यांचेविरूध्द कारवाई करुन कोतवाली, तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 129, 131 (क) प्रमाणे 05 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पथकाने वर नमुद कॅफेमध्ये मिळुन आलेल्या तरुण मुला मुलींना समज देऊन सोडून देण्यात आले आहे. गुन्हयाचा पुढील तपास कोतवाली, तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हे करत आहे.
सदर कारवाई मा.श्री.राकेश ओला,पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री.अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.