शिवप्रहार न्युज - श्रीरामपूरच्या महिलेचे नेवाशात गंठण मारले...

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपूरच्या महिलेचे नेवाशात गंठण मारले...

श्रीरामपूरच्या महिलेचे नेवाशात गंठण मारले...

   श्रीरामपूर/नेवासा (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथील सौ.रेखा संदीप आदिक, वय-३० या महिलेचे दीड लाखांचे सोन्याचे गंठण मारण्याचा प्रकार काल मंगळवारी घडला आहे.

      याबाबत सौ. आदिक यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, काल ०४ फेब्रुवारीला वाहेगाव, ता. गंगापूर येथील नातेवाईकाचे प्रवरासंगम येथील संगम लॉन्समध्ये लग्न होते. आपण पती, जाव, नंदा यांच्याबरोबर चारचाकी गाडीत दुपारी १२.३० ला संगम लॉन्स समोरील पार्कीगमध्ये उतरलो. तेव्हा पती हे गाडीत हवा भरायला प्रवरासंगमकडे गेले होते. तेव्हा मी, जाव असे आम्ही मंगल कार्यालयाकडे जात असताना एका पल्सर मोटारसायकलवरून दोन इसम आले व त्यांनी आपल्या गळयातील ०३ तोळ्याचे सोन्याचे गंठण बळजबरीने ओढून हे दोन भामटे नगरच्या दिशेने धूम स्टाईलने पळून गेले. आपण आरडाओरडा केला परंतू तोपर्यंत हे इसम पसार झाले होते. दोनही चोर हे २५ ते ३० वर्षे वयाचे असल्याचे म्हटले आहे. 

     याप्रकरणी अनोळखी दोघा चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नेवासा पोलीस करीत आहेत.