शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूरातून सिद्धार्थला पळविले; पोलिसांकडून शोध सुरू…

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूरातून सिद्धार्थला पळविले; पोलिसांकडून शोध सुरू…

श्रीरामपूरातून सिद्धार्थला पळविले; पोलिसांकडून शोध सुरू…

श्रीरामपूर- शहरातील वा.नं.६, खिलारी वस्ती परिसरात राहणाऱ्या एका कुटूंबातील सिद्धार्थ नावाच्या १५ वर्षे वयाच्या लहान मुलाला सकाळी ११ च्या सुमारास राहत्या घरातून तो कॉलेजला जातो म्हणून गेला. त्याला अज्ञात आरोपीने काहीतरी फुस लावून अज्ञात कारणासाठी पळवून नेले. सिद्धार्थच्या वडीलांनी श्रीरामपूर शहर पोलिसांत तक्रार दिल्यावरून अज्ञात आरोपीविरूद्ध भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

      पोनि.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. बोरसे हे विद्यार्थी व त्याला पळवून नेणाऱ्या आरोपीचा कसून शोध घेत आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.