शिवप्रहार न्यूज-आमच्या भागात कमी दाबाने पाणी का सोडले असे म्हणून महानगर पालिका कर्मचाऱ्याला तोंडावर चप्पल फेकुन मारहाण

आमच्या भागात कमी दाबाने पाणी का सोडले असे म्हणून महानगर पालिका कर्मचाऱ्याला तोंडावर चप्पल फेकुन मारहाण...
नगर -प्रतिनिधी- नगर महापालिका कर्मचारी गणेश मारुती गव्हाणे ,राहणार- वडगाव गुप्ता ,तालुका नगर हे अंधारे चौरे कॉलनी येथे नियमित पाणी सोडत असताना या भागातील रहिवासी आरोपी विकी बोरा ,रत्ना बोरा ,देवराम शेवाळे ,शोभा शेवाळे ,राहणार -अंधारे चौरे ,गांधिनगर, नगर शहर यांनी फिर्यादी गणेश गव्हाणे यांना आमच्या कॉलनी करता कमी दाबाने पाणी का सोडले असे बोलून गांधीनगर येथील पाणी सोडण्याच्या व्हॅाल्व्ह जवळ गव्हाणे यांना शिवीगाळ ,दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांड्याने मारहाण केली तसेच फिर्यादी गव्हाणे यांच्या तोंडावर चप्पल फेकून मारली म्हणून वरील आरोपींविरुद्ध तोफखाना पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 328/ 2021 भादवि कलम 353 ,332 ,323 ,504, 506 ,34 प्रमाणे सरकारी कामात अडथळा आणून सरकारी नोकरास मारहाण करून हल्ला करण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री मेढे हे करीत आहेत.