शिवप्रहार न्यूज- कत्तलीसाठी चाललेली 28 वासरे श्रीरामपूर शहर पोलिसांनी पकडली;आरोपीच्या निर्दयीपणामुळे लहान 13 वासरे मयत…

कत्तलीसाठी चाललेली 28 वासरे श्रीरामपूर शहर पोलिसांनी पकडली;आरोपीच्या निर्दयीपणामुळे लहान 13 वासरे मयत…
श्रीरामपूर- श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रभात डेअरी समोर समोरील बाभळेश्वर रोडवर आरोपी जावेद मुस्सा पठान ,वय 26 वर्षे,राहणार- ममदापुर ,तालुका -राहता याला एम एच 12 डीजी 9857 या पिकप मध्ये 28 वासरे कत्तलीसाठी घेऊन जात असताना पोलिसांनी पकडले. या अठ्ठावीस वासरांपैकी 13 वासरे जावेद पठाण याने अत्यंत निर्दयपणे या वासरांना वागविल्यामुळे मयत झाली आहे.
याप्रकरणी आरोपी जावेद पठाण विरोधात पोलीस शिपाई राहुल नरवाडे यांच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शेलार हे करीत आहेत.