शिवप्रहार न्यूज- अमोलची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या...

शिवप्रहार न्यूज- अमोलची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या...

अमोलची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या...

 श्रीरामपूर- श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी या गावात राहणारा तरुण अमोल रमेश पारदे,वय 27 वर्षे याने त्याच्या राहत्या घरी कोणतेतरी विषारी औषध सेवन केल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याला प्रवरा हॉस्पिटल ,लोणी येथे औषधोपचार कामी दाखल केले होते.परंतू उपचार सुरू असताना काल त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

       याबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात काल रोजी अपमृत्यू क्रमांक 48/2021 सीआरपीसी 174 प्रमाणे नोंद घेण्यात आली असून पुढील चौकशी पोलीस निरीक्षक श्री.साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार श्रीमती गायकवाड या करीत आहेत.

          अमोल याने नेमक्या कोणत्या कारणामुळे वीष पिऊन आत्महत्या केली याची चौकशी पोलीस करीत आहेत.