शिवप्रहार न्यूज-श्रीरामपूर तालुक्यातुन १५ वर्षीय मुलीला पळवले…

श्रीरामपूर तालुक्यातुन १५ वर्षीय मुलीला पळवले…
श्रीरामपूर (तालुका प्रतिनिधी)-श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर परिसरात राहणाऱ्या एका कुटूंबातील १५ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने काहीतरी आमीष दाखवून अज्ञात कारणासाठी कायदेशीर रखवालीतून फूस लावून पळवून नेले.
या घटनेने परिसरात पालक वर्गात खळबळ उडाली असून मुलीच्या वडीलांनी श्रीरामपूर तालुका पोलिसात फिर्याद दिल्यावरून अज्ञात आरोपीविरूद्ध भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान तालुका ठाण्याचे पोनि.मच्छिंद्र खाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. अल्पवयीन मुलगी व तिला पळवून नेणाऱ्या आरोपीचा हेकॉ. बर्डे हे कसून शोध घेत आहेत.