शिवप्रहार न्यूज- शेतात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; श्रीरामपूर पोलीस ठाण्यात पॉक्सो सह एट्रोसिटी दाखल ...

शेतात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; श्रीरामपूर पोलीस ठाण्यात पॉक्सो सह एट्रोसिटी दाखल ...
श्रीरामपूर- श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव या गावांमध्ये एक 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही तिच्या सावत्र आईसह शेतामध्ये संडास करण्यासाठी गेली असता त्या ठिकाणी रवी निंबाळकर, अण्णा निंबाळकर व इतर दोन आरोपींनी येऊन तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,वरील आरोपींनी अल्पवयीन मुलीचा हात धरून तिच्याशी शारीरिक जवळीक करण्याचा प्रयत्न केला आणि तिचा विनयभंग केला. या घटनेवरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यासह विनयभंग व ॲट्रॉसिटी कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास श्रीरामपूर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक श्री.संदीप मिटके हे करत आहेत. घटनास्थळी श्री.संदीप मिटके व श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. साळवे यांनी तात्काळ भेट दिली आहे.
तसेच यातील आरोपींना लवकरात लवकर अटक करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.