शिवप्रहार न्यूज- गणेशोत्सवात शनिवारी नळाला पाणी का येत नाही ? - संतप्त हिंदूंचा सवाल...

शिवप्रहार न्यूज- गणेशोत्सवात शनिवारी नळाला पाणी का येत नाही ? - संतप्त हिंदूंचा सवाल...

गणेशोत्सवात शनिवारी नळाला पाणी का येत नाही ? - संतप्त हिंदूंचा सवाल...

 श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरामध्ये इतर धर्मियांच्या सणाच्या काळात त्या लोकांच्या नळाला एकही दिवस खाडा न होता फुल प्रेशरने पाणी येते; परंतु हिंदूंच्या सणाच्या काळात शनिवारी एक थेंब पाणी येत नाही असं का ? असा सवाल श्रीरामपूर शहरातील संतप्त हिंदू समाजाच्या वतीने विचारण्यात येत आहे.

        याबाबत अधिक माहिती अशी की,श्रीरामपूर शहरासह राज्यभरात गणेशोत्सवास प्रारंभ झाला आहे . गणेशोत्सव हा हिंदू समाजाचा सण असून या सणाच्या काळात नगरपालिकेने आज शनिवारी नळाला पाणी सोडणे अपेक्षित होते पण पालिकेने पाणी सोडले नाही.इतर धर्मियांच्या सणाच्या काळात नगरपालिकेकडून फुल प्रेशरने दररोज पाणी सोडले जाते.परंतु हिंदू समाजाच्या सणाच्या काळात शनिवारच्या दिवशी पाणी बंद ठेवून कोरडा दिवस का पाळला जातो ? असा देखील सवाल संतप्त हिंदू समाजाचे नागरिक हे नगरपालिका प्रशासनाला विचारीत आहे.

        तरी हिंदुंच्या भावनांचा आदर ठेवुन नगरपालिका प्रशासनाने गणेशोत्सवाच्या काळात शनिवारी कोरडा दिवस पाळू नये व शनिवारी देखील पाणी सोडावे.जर हिंदूंच्या भावनांचा अपमान झाला तर “शिवप्रहार प्रतिष्ठान” स्वस्थ बसणार नाही. असा इशारा “ शिवप्रहार प्रतिष्ठानचे” कार्याध्यक्ष चंद्रशेखर उर्फ चंदू आगे यांनी दिला आहे.