शिवप्रहार न्यूज- वांबोरी घाटामध्ये वाहन चालकांना आडवून लुटणारी टोळी गिलवरसह पकडली ; नगर स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाची धडक कारवाई ..

शिवप्रहार न्यूज- वांबोरी घाटामध्ये वाहन चालकांना आडवून लुटणारी टोळी गिलवरसह पकडली ; नगर स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाची धडक कारवाई ..

वांबोरी घाटामध्ये वाहन चालकांना आडवून लुटणारी टोळी गिलवरसह पकडली ; नगर स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाची धडक कारवाई ...

वांबोरी -प्रतिनिधी 

भिंगार येथील रीतिक प्रेमचंद छलजानी, वय 20 हा तरुण दिनांक 23 /4 /2021 रोजी मित्रां सह गोरक्षनाथ गड ,मांजरसुंबा येथे वांबोरी फाटा मार्गे जात असताना गोरक्षनाथ गडाच्या चढावर मोटार सायकलचा वेग कमी झाला त्यावेळी समोरून दोन व पाठीमागून दोन असे चार अज्ञात इसम मोटर सायकल वरून फिर्यादी रितिक छजलानी जवळ आले व फिर्यादी व त्याच्या मित्रास मारहाण करून त्यांच्याजवळील तीन मोबाईल व सोन्याचे दागिने असा एकूण 11 लाख 65 हजार रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने चोरून नेला होता .याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येते गु.र.नंबर 254/ 2021भादवि कलम 394 ,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनील कटके यांना गोपनीय माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा विकास हानवत राहणार -कात्रड ,तालुका राहुरी याने व त्याच्या साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे ,सपोनि मिथुन घुगे, पोसई गणेश इंगळे ,स फौ नाणेकर यांच्यासह टीमने पो.नि.अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी ०१)विकास बाळु हनवत,वय-२४,रा.कात्रड,तालुका-राहुरी ०२) करण नवनाथ शेलार,वय-१९ ,रा-मोरेचिंचोरे,ता.नेवासा यांच्यासह त्यांच्या अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेतले.त्यांच्याकडे पो.नि.अनिल कटके यांच्या पथकाने तपास केला असता त्यांनी गुन्ह्याचा कबुली दिली.आरोपींकडुन चार मोटारसायकली,२मोबाईल ,रोख रक्कम व गिलवर असा एकुण १,७३,७००₹ किंमतीचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे.आरोपी विकास हानवत याच्यावर नगर जिल्ह्यातील  वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये चोरी ,जबरी चोरी,दरोड्याचे ०६ गुन्हे दाखल आहेत.
          सदरची कारवाई नगर एसपी सो.,ॲडीशनल एसपी सो.,नगर डीवायएसपी  सो. यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पो.नि.श्री.अनिल कटके यांच्या पथकाने केली.