शिवप्रहार न्यूज- आमच्या आंदोलनामुळे श्रीरामपूर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण मिळाले- उपनगराध्यक्ष.

शिवप्रहार न्यूज- आमच्या आंदोलनामुळे श्रीरामपूर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण मिळाले- उपनगराध्यक्ष.

आमच्या आंदोलनामुळे श्रीरामपूर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण मिळाले- उपनगराध्यक्ष.

श्रीरामपूर – सध्या श्रीरामपूर नगरपालिकेचे कर्मचारी कोरोनासारख्या महामारीत आपले कर्तव्य बाजावत आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून हे कर्मचारी रात्रदिवस काम करत असतात.त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण मिळावे, अशी आग्रही मागणी उपनगराध्यक्ष करण ससाणे व कॉग्रेस च्या नगरसेवकांनी वांरवार केली होती. त्या मागणीला अखेर यश आले असुन पालिकेच्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
               याप्रश्नी कॉग्रेस च्या वतीने अनेक वेळेस निवेदनेही दिली होती.त्यासाठी नगरपालिकेच्या जनरल बोर्डाच्या मीटिंग मधेही सतत मागणी करण्यात आली होती . तसेच पालिकेच्या अर्थसंकल्पात विम्याची तरतूद असूनही केवळ नगराध्यक्ष मॅडम यांना  कर्मचाऱ्यांच्या अडचणीची जाणीव नसल्यामुळे विम्याचा लाभ मिळत नव्हता. 
                   अडचणीच्या परिस्थीतीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना सारख्या आजाराचा खर्च पेलत नव्हाता.त्यामुळे अनेकांनी आजार अंगावर काढला. त्यात २ कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे उपनगराध्यक्ष करण ससाणे व कॉंग्रेस नगरसेवकांनी नगरपालिकेच्या गेटवर अर्थसंकल्पाची होळी करून आंदोलन केले होते. त्याचा परिणाम म्हणुन नगरपालिका सत्ताधाऱ्यांना जाग आली व कर्मचाऱ्यांसाठी विमा संरक्षण त्यांना द्यावे लागले. 
                परंतु पालिकेने या विमा योजनेत आरोग्य,बांधकाम,पाणीपुरवठा,अतिक्रमण ,वसुली,लाईट, वाहन या विभागात ठेक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप त्यांनी केला.