शिवप्रहार न्यूज- सायरन वाजवत अँब्युलन्स मधुन देशी ची वाहतुक करणारे दोघे पकडले....

सायरन वाजवत अँब्युलन्स मधुन देशी ची वाहतुक करणारे दोघे पकडले....
संगमनेर- तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहे.दारूची दुकाने बंद असतानाही तालुक्यात दारूची विक्री केली जात आहे. दोघा युवकांनी काल दहा वाजता संगमनेर शहरातीलच एका दारूच्या दुकानातून दारू विकत घेतली.शहरातुन बाहेर ही देशी दारू नेण्यात येणार होती. पोलीस बंदोबस्त असल्याने अँब्युलन्स मधुन आरोपींनी दारु बाहेर नेण्याचे ठरवले.ते सायरन वाजवत शहरातून रुग्णवाहिका घेवुन जात होते. बस स्थानक परीसरात बंदोबस्त साठी उभ्या असणाऱ्या पोलिसांनी या रुग्णवाहिकेचा संशय आला.पोलीस निरीक्षक देशमुख व पोलिसांनी ही रुग्णवाहिका अडवून आत मध्ये पाहणी केली असता रुग्णवाहिकेत देशी दारूचे सात बॉक्स ठेवण्यात आले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.म्हणुन पोलिसांनी कैलास नागरे (रा .शेडगाव ),विजय फड (रा.मालदाड रोड ,संगमनेर )या दोघांना ताब्यात घेतले .रुग्ण वाहीकेसह त्यांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले .पोलीस शिपाई उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध भारतीय दंड संहिता १८८,२६९,६५ ,(अ) महाराष्ट्र दारूबंदी अन्वये गुन्हा दाखिल करण्यात आला आहे.