शिवप्रहार न्यूज-कॉपी करताना मास्तरने पकडले म्हणून विद्यार्थिनीची बेलापूरच्या नदीत उडी...

कॉपी करताना मास्तरने पकडले म्हणून विद्यार्थिनीची बेलापूरच्या नदीत उडी...
श्रीरामपूर -श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील केशव गोविंद माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयातील अकरावीच्या विद्यार्थिनीचा आज सकाळी पेपर सुरू असताना शिक्षकाने कॉपी पकडली. सर्वांसमोर कॉपी पकडल्या गेल्यामुळे प्रचंड नाराज होऊन या विद्यार्थिनीने बेलापूरच्या प्रवरा नदीत उडी टाकली.
त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी तात्काळ पाण्यात उड्या मारून विद्यार्थिनीला पाण्याबाहेर काढले. परंतु नाका -तोंडात पाणी गेल्याने विद्यार्थिनी बेशुद्ध पडली होती. त्यानंतर तिला पुढील उपचारासाठी श्रीरामपुरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाने पालकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.