शिवप्रहार न्युज - श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे विश्वासु सरदार नितीनदादांचा "शिवप्रहार"च्या मुंबईतील आंदोलनाला जाहिर पाठिंबा…

शिवप्रहार न्युज -  श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे विश्वासु सरदार नितीनदादांचा "शिवप्रहार"च्या मुंबईतील आंदोलनाला जाहिर पाठिंबा…

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे विश्वासु सरदार नितीनदादांचा "शिवप्रहार"च्या मुंबईतील आंदोलनाला जाहिर पाठिंबा…

मुंबई/श्रीरामपूर - दिनांक ०५ जुलै २०१३ पासून शिवप्रहार प्रतिष्ठानचे महाराष्ट्रात लव जिहादवर कायदा करावा,श्रीरामपूर जिल्हा व्हावा व इतर मागण्यांकरिता मुंबई येथील आजाद मैदानात धरणे आंदोलन चालू आहे.आज या आंदोलनाच्या ११ व्या दिवशी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे अत्यंत विश्वासु सरदार तथा शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष श्री.नितीनदादा चौगुले यांनी भेट दिली व शिवप्रहारच्या आंदोलनाला पूर्ण समर्थन असल्याचे माजी पोलीस अधिकारी सुरजभाई आगे यांना कळवले.

      या धरणे/ठिय्या आंदोलनात सरकारकडे लव्ह जिहाद कायदा व प्रभू श्रीरामांच्या नावाने वसलेले “श्रीरामपूर जिल्हा”घोषित करावे यासह छत्रपती संभाजीनगर नामकरणची थांबलेली अंमलबजावणी पुन्हा सुरू करावी,श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य शिवस्मारकास शासनाने मंजुरी द्यावी,अहिल्यानगर नामकरण घोषणेची अंमलबजावणी करावी तसेच देशभक्त IRS अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरील गुन्हा मागे घेण्यात यावा या व इतर मागण्या करण्यात आलेल्या आहे.

         आजपर्यंत अनेक संघटना व शिवभक्तांनी या आंदोलनाला प्रत्यक्ष आझाद मैदान,मुंबई येथे येवुन पाठिंबा दिला आहे.