शिवप्रहार न्युज - टाकळीभानमध्ये कापूस व्यापाऱ्याची ०३ लाखाची बॅग पळवली…

शिवप्रहार न्युज -  टाकळीभानमध्ये कापूस व्यापाऱ्याची ०३ लाखाची बॅग पळवली…

टाकळीभानमध्ये कापूस व्यापाऱ्याची ०३ लाखाची बॅग पळवली…

श्रीरामपूर/शिवप्रहार न्यूज -कापूस व्यापाऱ्याची तीन लाख रुपयांची रोकड असलेली बॅग दुचाकी वर आलेल्या चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान मध्ये घडले आहे.टाकळीभान मधील कापूस व्यापारी रामेश्वर लोखंडे हे काल सकाळी आपल्या जय संताजी ट्रेडिंग नावाच्या दुकानांमध्ये तीन लाख रुपयांची रोकड असलेली बॅग गळ्यामध्ये अडकवून बसलेले असताना तिघा जणांनी विना नंबरच्या दुचाकी वर येत दोघाजणांनी लोखंडे यांच्या दुकानात जाऊन गळ्यातील बॅग हिसकावून पुन्हा दुचाकीवर बसून श्रीरामपूरच्या दिशेने धूम ठोकली.

       याप्रकरणी लोखंडे यांनी श्रीरामपूर तालुका पोलीसांत तक्रार दिल्यावरून अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिवसा झालेल्या व्यापारी लुटीच्या घटनेने चोरट्यांना धाक उरला की नाही ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.