शिवप्रहार न्युज - SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ तपास लावल्याबद्दल LCB,नगर PI श्री.कटकेंचा ग्रामस्थांकडून सत्कार…

शिवप्रहार न्युज - SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ तपास लावल्याबद्दल LCB,नगर PI श्री.कटकेंचा ग्रामस्थांकडून सत्कार…

SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ तपास लावल्याबद्दल LCB,नगर PI श्री.कटकेंचा ग्रामस्थांकडून सत्कार…

श्रीरामपूर-दिनांक 04/11/2022 रोजी श्री. निखील बाळासाहेब वाघ, वय 22, रा. वाघवस्ती, चारी क्र.11, कारेगांव, ता. श्रीरामपूर हे रात्रीचे जेवण करुन दरवाजा खिडक्या बंद करुन कुटूंबियासह झोपलेले असतांना अनोळखी चार इसमांनी घराचे किचनचे दरवाजाची कडीकोंडा कटावणीच्या सहाय्याने तोडुन घरात प्रवेश करुन, चाकुचा धाक दाखवुन साक्षीदारांना कटावणी व लाथाबुक्यांनी मारहाण व जखमी करुन घरातील सामानाची उचका पाचक करुन 2,71,000/- हजार रु.किंमतीचे सोन्याचे दागिने घेवुन गेले आहे. 

    सदर गुन्ह्याचा तपास श्री. राकेशजी ओला साहेब पोलीस अधीक्षक,

नगर यांच्या मार्गदर्शनाखाली जलद गतीने लावून शेतकरी कुटुंबाचे चोरी गेलेले सोने परत मिळून दिल्याबद्दल कारेगाव ग्रामस्थांच्या वतीने श्री.अनिलजी कटके पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा,नगर यांचा सत्कार करताना बाळासाहेब पटारे, पंढरीनाथ वाघ,आनंद वाघ, शिवाजी दौंड ,नवनाथ वाघ, शरद वाघ, शुभम वाघ, निखिल वाघ, सुनील पटारे आदी.