शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात पाळीव कुत्र्याला मारहाण करून पोलिसाला धमकी…

श्रीरामपुरात पाळीव कुत्र्याला मारहाण करून पोलिसाला धमकी…
श्रीरामपूर -श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर ०१ गोंधवणी परिसरात राहणारे पोलीस हेडकॉन्स्टेबल विलासराव भांगे यांच्या पाळीव कुत्र्याला काल सायंकाळी याच भागात राहणारा आरोपी ताया मारुती शिंदे ,त्याची दोन मुले व अन्य एक जण यांनी काठीने बेदम मारहाण केली.त्यामुळे हे कुत्रे जखमी झाले असून सदर मुक्या प्राण्याला का मारले त्याला मारू नका अशी विनंती पोलीस हेडकॉन्स्टेबल विलासराव भांगे यांनी शिंदे यांना केली असता त्यांनी समजून न घेता शिवीगाळ करत पोलीस भांगे यांनाच धमकी दिली.
याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल विलासराव भांगे यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसात ताया मारुती शिंदे ,त्याची दोन मुले व अन्य एकावर अशा चौघांविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम कलम 11 सह भादवी कलम 504,506 प्रमाणे श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोनि गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सफौ हापसे हेकरीत आहे.