शिवप्रहार न्यूज-हरेगाव फाट्यावरील अपघात एक जण ठार व एक जखमी…

शिवप्रहार न्यूज-हरेगाव फाट्यावरील अपघात एक जण ठार व एक जखमी…

हरेगाव फाट्यावरील अपघात एक जण ठार व एक जखमी…

श्रीरामपूर - शहराजवळ असणाऱ्या हरेगाव फाटा परिसरात एका हॉटेल समोर झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.दोन मोटारसायकलींमध्ये समोरासमोर हा अपघात झाला.यामध्ये माळेवाडी येथील श्री.गणेश खिलारी यांची हिरो होंडा स्प्लेंडर व उंदीरगाव येथील श्री.दिलावर यांची 4s मोटर सायकल या दोन गाड्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली.

           त्यानंतर श्री.दिलावर यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला असून श्री.खिलारी यांच्यावर उपचार चालू आहेत.याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांकडून पुढील तपास चालू आहे.