शिवप्रहार न्यूज- सासरच्या त्रासाला कंटाळून श्रीरामपूर तालुक्यात विवाहितेची आत्महत्या…
Married Shrirampur

सासरच्या त्रासाला कंटाळून श्रीरामपूर तालुक्यात विवाहितेची आत्महत्या…
श्रीरामपूर- श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण या गावात सासरी नांदत असलेल्या सौ.साक्षी अभिजीत उर्फ दादासाहेब भोसले,वय १९, राहणार- भामाठाण हिला तिच्या सासरच्या लोकांनी त्रास दिल्यामुळे तिने विषारी औषध घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
याप्रकरणी मयत महिलेच्या नातेवाईकांच्या तक्रारीनुसार श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात साक्षी चा नवरा अभिजीत उर्फ दादासाहेब भोसले, सासरे रावसाहेब भोसले,सासू अनिता भोसले,सर्व राहणार- भामाठाण यांच्याविरोधात हुंडाबळीच्या कलमान्वये चौकशीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक श्री.खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास तालुका पोलिसांकडून चालू आहे.