शिवप्रहार न्युज - ईदच्या अनुषंगाने राबविले ऑपरेशन ऑल आऊट;पोलीसांनी 79 गोवंशांचे प्राण वाचवले...

शिवप्रहार न्युज - ईदच्या अनुषंगाने राबविले ऑपरेशन ऑल आऊट;पोलीसांनी 79 गोवंशांचे प्राण वाचवले...

ईदच्या अनुषंगाने राबविले ऑपरेशन ऑल आऊट;पोलीसांनी 79 गोवंशांचे प्राण वाचवले...

नगर- या प्रकरणी अधिक माहिती अशी की,श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी बकरी ईदच्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनला दिनांक 05/06/2025 रोजी 18.00 पासुन ते दिनांक 06/06/2025 रोजी 02.00 वा. या कालावधीमध्ये ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात आदेश दिले. 

ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान गोवंश जनावरांचे कत्तल/प्राणी संरक्षण कायदयांतर्गत केसेस, कत्तलखाने चेकींग, रेकॉर्डवरील सराईत आरोपी चेंकीग, गोवंश जनावरांची कत्तलबाबत दाखल गुन्हयांतील सराईत आरोपींची चेंकीग करणेबाबत सुचना व आदेश दिलेले होते. अहिल्यानगर जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर असे एकुण 32 पोलीस अधिकारी व 250 पोलीस अंमलदार यांचेकडून राबविण्यात आलेल्या ऑपरेशन ऑल आऊटमध्ये खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. 

 

अ.क्र.|केलेली कारवाई|कारवाईची संख्या।जप्त मुद्देमाल।

1 प्राणी संरक्षण कायदयान्वये दाखल केसेस (गोवंश जनावरे)-13 केसेस,

जप्त मुद्देमाल- एकूण 37,03,000/- रू किं. त्यात 79 गोवंश जातीचे जनावरे वाचविण्यात यश आले.

2 गोवंश जनावरांची कत्तल करणारे सराईत आरोपी चेंकींग-64 

3 कत्तलखाने चेकींग-32 

4 सराईत आरोपी चेकींग-113 

5 चेक पोस्ट चेकींग-23 

         सदरची कारवाई मा.श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर व मा.श्री.वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन यांनी केली आहे.