शिवप्रहार न्युज -श्रीरामपुरातील व्यापारी निखिल कासलीवाल यांचे रोड अपघातात निधन…

श्रीरामपुरातील व्यापारी निखिल कासलीवाल यांचे रोड अपघातात निधन…
श्रीरामपूर- याबाबत अधिक माहिती अशी की,काल शुक्रवार दि.२१/२/२०२५ रोजी सायंकाळी ७:३० चे सुमारास श्रीरामपूर येथील व्यापारी निखिल संजय कासलीवाल (वय -२५) बलेनो गाडीमध्ये पुणतांबाहून श्रीरामपूर कडे येत असताना रेल्वे बोगद्याच्या भिंतीला गाडीचा अपघात झाल्याने निखिल कासलीवाल यांना डोक्याला मार लागला. त्यांना सुरुवातीस श्रीरामपूर येथे डॉक्टर अनारसे यांच्याकडे नेले असता गंभीर जखमी असल्याने पुढील उपचारासाठी नगर येथील मॅक्सकेअर हॉस्पिटल येथे ॲडमिट करण्यात आले होते.परंतू आज शनिवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.
निखील कासलीवाल यांच्या अकाली जाण्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. ते जैन समाज अध्यक्ष व व्यापारी असोसिएशनचे संचालक श्री.संजय कासलीवाल यांचे चिरंजीव होते.