शिवप्रहार न्यूज -आजच्या श्रीरामपूर बंदला चांगला प्रतिसाद…

आजच्या श्रीरामपूर बंदला चांगला प्रतिसाद…
श्रीरामपूर -
शहरामध्ये आज अतिक्रमण विरोधी कारवाईला प्रतिबंध लागावा व गोरगरिबांची उध्वस्त झालेले संसार पुन्हा बसवण्यात यावे,त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे.या मागणीसाठी अतिक्रमण कारवाई विरोधी पुनर्वसन समिती व व्यापारी असोसिएशनच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला होता.
आज रविवार दि.२३ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या या श्रीरामपूर बंद मध्ये मेनरोड,छत्रपती शिवाजी महाराज रोड परिसरातील अनेक व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे व स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून पाठिंबा दिला.तर काही भागात दुकाने चालू होती.एकंदर या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.नागरिकांच्या पुनर्वसनासाठी समिती आग्रही आहे.