शिवप्रहार न्युज -अशोकनगरला १२ वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला...

अशोकनगरला १२ वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला...
अशोकनगर - श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याचा परिसर असलेल्या अशोकनगर गावामध्ये एका कॉलेजात बारावीच्या परीक्षेसाठी आलेला विद्यार्थी सार्थक शरद गोर्डे याला दहा-बारा जणांच्या टोळक्याने कुऱ्हाड,रॅाड,लाठ्या-काठ्याने मारहाण करुन हल्ला केला.अशोकनगर फाट्यावर ही घटना घडली आहे.तसेच हातावर व पाठीवर वार करत त्याला जखमी केले.तसेच सार्थकच्या ताब्यातील वॅगनार गाडी क्रमांक एम.एच.१२ जीके ०९२३ हिची देखील तोडफोड करण्यात आली.दरम्यान एका आरोपीच्या हातातील कुऱ्हाड गाडीत बसलेल्या सार्थकवर वार करताना पडल्याने तिथे सोडून आरोपी अशोकनगर फाट्यावरून पळून गेले.जुन्या वादातून हि घटना घडल्याचे कळते.
जखमी विद्यार्थी सार्थक शरद गोर्डे याला श्रीरामपूर शहरातील कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.काल गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली परंतु अद्यापपर्यंत शहर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती मिळत आहे.
ह्या हल्ल्यात जखमी विद्यार्थी सार्थक गोर्डे याच्या आईने म्हटले आहे की,यापूर्वी देखील त्यांनी ०३ एनसी गुन्हे दाखल केले होते.आता तरी हल्लेखोर आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.जर कारवाई झाली नाही तर पोलीस स्टेशनमध्ये येवुन फाशी घेईल असा इशारा विद्यार्थी सार्थक याच्या आईने दिला आहे.