शिवप्रहार न्युज -तांबे,ॲल्युमिनीयम स्क्रॅपची वाहतुक करणारा कंटेनर ताब्यात;01 कोटी 38 लाखाचा मुद्देमाल जप्त,LCB ची कारवाई …

शिवप्रहार न्युज -तांबे,ॲल्युमिनीयम स्क्रॅपची वाहतुक करणारा कंटेनर ताब्यात;01 कोटी 38 लाखाचा मुद्देमाल जप्त,LCB ची कारवाई …

तांबे,ॲल्युमिनीयम स्क्रॅपची वाहतुक करणारा कंटेनर ताब्यात;01 कोटी 38 लाखाचा मुद्देमाल जप्त,LCB ची कारवाई …

नगर-

याबाबत ची अधिक माहिती अशी की,श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना जिल्हयातील अवैध व्यावसायिकांविरूध्द कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.त्यानुषंगाने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार संतोष लोढे, फुरकान शेख, संतोष खैरे, शिवाजी ढाकणे, किशोर शिरसाठ व प्रशांत राठोड अशांचे पथक नेमून कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.

 या पथकास गुप्त बातमीदारामार्फत कंटेनर क्रमांक आरजे-09-जीडी-3605 यामध्ये बेकायदेशीरपणे तांबे व ऍ़ल्युमिनीअमचा भंगार माल पुणे येथून दिल्लीकडे जात असून तो सध्या दिल्ली पुना ट्रान्सपोर्ट एजन्सी, एमआयडीसी, अहिल्यानगर येथे थांबलेला आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. पथकाने पंचासमक्ष मिळालेल्या माहितीवरून एमआयडीसी, अहिल्यानगर येथे जाऊन खात्री केली असता संशयीत कंटेनर मिळून आल्याने कंटेनर चालकास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) शैलेंद्र सोरन सिंह, वय 45, रा.घर क्रमांक जे 489 ब्लॉक, गल्ली क्र.1, खड्डा कॉलनी, स्वरूपनगर, नॉर्थ वेस्ट दिल्ली असे असल्याचे सांगीतले. त्याचेकडे कंटेनरमधील मालाबाबत विचारपूस केली असता तो अर्धवट व दिशाभुल करणारी माहिती सांगु लागला.पथकाने पंचासमक्ष कंटनेरचा दरवाजाचा उघडून पाहणी केली असता त्यामध्ये तांब्याचे पाईप असलेले बंडल, तांब्याचे जुने भांडे, तांब्याची तार, ऍ़ल्युमिनीअमची वेगवेगळया आकाराचे तुकडे असलेला भंगार माल मिळून आला. 

 पथकाने कंटेनर चालकाकडे मुद्देमालाचे पावतीबाबत विचारपूस केली असता त्याने मुद्देमालाची पावती दाखविली. मुद्देमालाबाबत बिल्टी व प्रत्यक्षात असलेला मुद्देमाल यामध्ये तफावत दिसुन आल्याने कंटनेर चालक 1) शैलेंद्र सोरन सिंह, वय 45, रा.घर क्रमांक जे 489 ब्लॉक, गल्ली क्र.1, खड्डा कॉलनी, स्वरूपनगर, नॉर्थ वेस्ट दिल्ली यास ताब्यात घेऊन, कंटनेरमधील 30,00,000/- रू किं.त्यात एक टाटा कंपनीचे कंटेनर रजिस्टर क्रमांक आरजे-09-जीडी-3605 व 1,08,00,000/- रू किं.एकुण 18,000 किलोग्रॅम वजनाचे तांबे व ऍ़ल्युमिनीअम धातुचे भंगार माल असा एकुण 1,38,00,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 

 ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन जप्त केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने 2) ट्रान्सपोर्टचे मालक पुरूषोत्तम तिलकराज अग्रवाल, रा.पुणे (फरार) यांचे सांगणेवरून मालाचे पुरवठादार 3) एच. एस. ट्रेडींग कंपनी, सदयंकुप्पम, तामीळनाडू यांचेकडील मालापैकी तांब्याचे पाईप असलेले बंडल 4) बब्बु पुर्ण नाव माहिती नाही व 5) बब्बु याचा मित्र यांनी वाघोली, जि.पुणे येथून कंटेनरमध्ये भरून दिला.कंटनेरमधील मुद्देमाल हा दिल्ली येथे गेल्यानंतर माल कोठे पोहच करावयाचा आहे याबाबत माहिती नंतर सांगणार होते अशी माहिती सांगीतली.

 पथकास कंटनेर चालक 1) शैलेंद्र सोरन सिंह, वय 45, रा.घर क्रमांक जे 489 ब्लॉक, गल्ली क्र.1, खड्डा कॉलनी, स्वरूपनगर, नॉर्थ वेस्ट दिल्ली याचे ताब्यातील कंटनेरमध्ये वाहनाचे मालक, मालाचे खरेदीदार, व पुरवठादार यांचे मदतीने तांबे व ऍ़ल्युमिनीअमचा भंगार माल बेकायदेशीरपणे भरून, खोटी व बनावट बिल्टी तयार करून, सदरचा मुद्देमाल काळया बाजारात विक्री करण्याचे हेतुने दिल्ली येथे घेऊन जाण्याकरीता मिळून आल्याने 05 आरोपीविरूध्द एमआयडीसी पोलीस स्टेशन गुरनं 88/2025 बीएनएस कलम 303 (2), 336 (3), 340 (2), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ताब्यातील आरोपीस मुद्देमालासह एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयांचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन हे करीत आहेत. 

    सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री.प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर व मा.श्री.संपत भोसले, नगर ग्रामीण उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.