शिवप्रहार न्यूज- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरात धुमधडाक्यात शिवजयंती साजरी;पोलिसांनी ठेवला कडेकोट बंदोबस्त…

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरात धुमधडाक्यात शिवजयंती साजरी;पोलिसांनी ठेवला कडेकोट बंदोबस्त…
श्रीरामपूर -श्रीरामपूर शहरातील सर्व प्रमुख चौकांमध्ये धुमधडाक्यात शिव जयंती साजरी करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज चौक,श्रीराम मंदिर चौक,भगतसिंग चौक यासह इतर अनेक चौकांमध्ये तिथीप्रमाणे शिवजयंती जल्लोषात साजरी होताना दिसली.
यावेळी श्रीरामपूर पोलिसांकडून कडेकोट चोख बंदोबस्त चे आयोजन करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक श्री. मनोज पाटील ,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर यांच्या आदेशानुसार आणि श्रीरामपूर उपविभागाचे डीवायएसपी श्री.संदीप मिटके व पोलीस निरीक्षक श्री.संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हा शिवजयंती उत्सव शांततेत पार पडला.
लवकरच होऊ घातलेल्या श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती आल्याने अनेक इच्छुकांनी मोठ्या प्रमाणावर शिवजयंती साजरी केली.तसेच काही इच्छुक नेतेमंडळींनी कार्यकर्त्यांना रसद पुरवून शिवजयंती साजरी करण्यात हातभार लावला.
जनतेने याबाबत आनंद व्यक्त करत फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाही तर दरवर्षी अशी शिवजयंती साजरी व्हायला हवी अशी भावना मांडली.