शिवप्रहार न्यूज- हरेगावच्या ग्रामस्थांचे मुंबईमधील उपोषण मागे…

हरेगावच्या ग्रामस्थांचे मुंबईमधील उपोषण मागे…
श्रीरामपूर - श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम सुरू करावे या मागणीसाठी हरेगावचे ग्रामस्थ रवींद्र वाहुळ, माधव झाल्टे ,जनार्दन दुशिंग, सूनील नरवडे ,भाऊसाहेब हिवाळे ,गुलाब पठारे आदी ग्रामस्थ आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणासाठी बसले होते.
गेल्या पाच दिवसापासून चालू असलेल्या या आमरण उपोषणाला आमदार लहू कानडे यांनी भेट देऊन स्मारकाबाबत सकारात्मक चर्चा त्यांच्याशी केली.त्यानंतर उपोषण स्थगित करत असल्याची माहिती उपोषणकर्ते यांनी दिली. हरेगाव येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक काम सुरु करावे या मागणीला “शिवप्रहार प्रतिष्ठान” या शिवछत्रपतींच्या अठरापगड जातीच्या हिंदुत्वाच्या विचारांवर कार्य करणाऱ्या संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे.