शिवप्रहार न्युज-माळवडगाव शेतकरी फसवणूक प्रकरणाच्या निमित्ताने झाले शिवछत्रपतींचे स्मरण 

शिवप्रहार न्युज-माळवडगाव शेतकरी फसवणूक प्रकरणाच्या निमित्ताने झाले शिवछत्रपतींचे स्मरण 

शिवप्रहार न्युज-माळवडगाव शेतकरी फसवणूक प्रकरणाच्या निमित्ताने झाले शिवछत्रपतींचे स्मरण 


श्रीरामपूर – माळवडगाव पंचक्रोशीत शेतकर्यांचे कोट्यावधी रुपये बुडवून फरार झालेल्या रमेश व चंदन मुथ्था या हरामखोर वृत्तीच्या व्यापार्यांना पोलिसांनी काल अटक केली.गोर-गरीब कष्टकरी, शेतकऱ्यांचे लुबाडून नेलेले करोडो रुपये या निर्लज्ज प्रवृतींच्या व्यापार्यांकडून प्रशासना मार्फत या कष्टकरी शेतकर्यांना परत मिळतील आणि शेतकर्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.
                   या घटनेच्या निमित्ताने युगप्रवर्तक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेतकरी विषयक धोरणाचे स्मरण होते.छत्रपतींच्या स्वराज्यात शेतकरी सुखाने नांदत होता.एकही शेतकर्याने आत्महत्या केल्याचे आढळत नाही , शेतकऱ्यांना बी-बियाणे,बैलगाडी,नांगर इ. घेण्यासाठी छत्रपती मदत करत असे.सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांनी कष्ट करून,मेहनत घेवुन कमावलेला माल नफेखोर व्यापार्यांना कवडीमोल भावात खरेदी करता येत नव्हता.याचे कारण शेतमालाच्या किंमती छत्रपती स्वतःहा ठरवुन देत असे.त्यामुळे व्यापाऱ्यांना शिवाजी महाराजांनी ठरवलेल्या दरात माल खरेदी करावा लागत होता.म्हणजेच कष्टकरी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी छत्रपतींनी व्यापार्यांवर कडक नियंत्रण ठेवले होते. आज मात्र परीस्थिती उलटी आहे.