शिवप्रहार न्युज - उमेदवारीसाठी श्रीरामपूरच्या उमेदवारांच्या मुंबई फेऱ्या…

उमेदवारीसाठी श्रीरामपूरच्या उमेदवारांच्या मुंबई फेऱ्या…
श्रीरामपूर - श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातून महायुती व महाविकास आघाडीकडून इच्छुक उमेदवार यांच्या उमेदवारी मिळावी यासाठी मुंबईकडे फेऱ्या वाढल्या आहेत.काँग्रेसकडून विद्यमान आमदार लहू कानडे,हेमंत ओगले हे इच्छुक आहेत.तर महायुतीकडून भाजपचे नितीन उदमले,नितीन दिनकर यांच्यासह शिंदे सेनेचे लोखंडे,कांबळे,तोरणे हे इच्छुक आहेत.
महायुती व महाविकास आघाडीच्या इच्छुकांनी उमेदवारीची माळ आपल्याच गळ्यात पडावी यासाठी मुंबईच्या फेऱ्या वाढवल्या आहेत अशी माहिती मिळते.दरम्यान युती व आघाडीकडुन उमेदवारी कोणाला मिळेल याचे चित्र दोन-चार दिवसात स्पष्ट होईल.