शिवप्रहार न्युज - वाद होऊन डोक्यात खुर्ची; श्रीरामपुरातील हॉटेलमधला प्रकार...

वाद होऊन डोक्यात खुर्ची; श्रीरामपुरातील हॉटेलमधला प्रकार...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज) - हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या दोघा मित्रांना ओळखीचा एकजण भेटला. त्यानंतर तिघे एकत्र गप्पा मारत असताना चेष्टा-मस्करी होवून त्याचा राग आल्याने एकाने दुसऱ्याच्या डोक्यात लोखंडी खुर्ची मारून त्याला जबर जखमी करण्याचा प्रकार श्रीरामपूर शहरात घडला आहे.
याबाबत तन्वीर मासूम शेख, वय-३६, धंदा- शेळया खरेदी विक्री, रा. शिरसाठ हॉस्पीटलजवळ, वॉर्ड नं.४, श्रीरामपूर याने फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, मी व माझा मित्र नवाय युनूस शेख असे जेवण करण्यासाठी सेंटर बिअरबार येथे गेलो होतो. तेथे अगोदरच आमच्या ओळखीचा मित्र समीर मुनीर बसलेला होता. ओळख असल्याने आम्ही तिघे सोबत जेवायला बसलो. त्यानंतर आमच्यात गप्पा सुरू झाल्या आणि त्याचवेळी नवाज आणि समीर यांच्यात चेष्टा मस्करी सुरू झाली. घरचा फोन आला म्हणून आपण थोडावेळ बाहेर गेलो आणि परत आलो असता त्यांच्यामध्ये झटापट सुरू होती. आपण सोडवासोडवीचा प्रयत्न केला असता समीर याने लोखंडी खुर्ची उचलून नवाज याच्या डोक्यात मारल्याने तो जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी तन्वीर शेख याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी समीर मुनीर शेख याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.