शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूर शहरातून दोन हिरो होंडा मोटारसायकलींची चोरी...

श्रीरामपूर शहरातून दोन हिरो होंडा मोटारसायकलींची चोरी...
श्रीरामपूर - शहरातील गांधी पुतळ्याजवळ असलेल्या गुमास्ता बिल्डिंग येथे लावलेली मोटारसायकल एम एच 17 ऐके 16 83 हि मालक अमित अशोक गुळस्कर ,राहणार -काळाराम मंदिराजवळ ,श्रीरामपूर यांची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसर्या घटनेत श्रीरामपूर शहरालगत असणाऱ्या दत्तनगर येथून प्रशांत विजय पठारे, वय 35 ,राहणार -दत्तनगर यांची हिरो होंडा कंपनीची पॅशन प्लस एम एच 17 एबी 41 18 ही अज्ञात चोरट्याने दत्तनगर येथून चोरून नेल्याची घटना घडली.याप्रकरणी देखील शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलिस नाईक पंडित व पोलीस नाईक शेलार हे पोलीस निरीक्षक श्री.संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
तसेच श्रीरामपूर बस स्थानक परिसरातून कडूबाई साळुंखे या महिलेचा दोन हजार रुपये किमतीचा मोबाईल देखील चोरल्याची घटना घडली असून त्या बाबतीत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
कोरोना लॅाकडाऊन मुळे आधीच अडचणीत असलेल्या सर्वसामान्यांच्या बाबतीतच चोरट्यांनी चांगला हात साफ केला आहे.