शिवप्रहार न्यूज- यशस्वी होण्यासाठी अथक प्रयत्नांची पराकाष्ठा करा - पद्मश्री राहीबाई पोपेरे 

शिवप्रहार न्यूज- यशस्वी होण्यासाठी अथक प्रयत्नांची पराकाष्ठा करा - पद्मश्री राहीबाई पोपेरे 

यशस्वी होण्यासाठी अथक प्रयत्नांची पराकाष्ठा करा - पद्मश्री राहीबाई पोपेरे 

लोणी ( प्रतिनिधी )डॉ विखे पाटील फाउंडेशन, पुणे यांचे लिट्ल फ्लॉवर स्कूलच्या उच्च माध्यमिक विभागाने गौरवशाली भारताचा भाग या विषयीवर आधारित भव्यदिव्य स्वरूपामध्ये कुशल अभिनय व नृत्याविष्कारांच्या माध्यमातून गौरवशाली भारताचा इतिहासाचे हुबेहूब सादर केला या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या बीजमाता पद्मश्री राहीबाई सोना पोपेरे होत्या.

       आपल्या मनोगतात म्हणल्या की यशस्वी होण्यासाठी अथक प्रयत्नांची पराकाष्टा करणे गरजेचे आहे.संघर्षानेच माणसाचे उत्तम रूप घडत असते.सामान्य आदिवासी स्त्री ते पद्मश्री राहीबाई सोमा पोपरे हा खडतर प्रवासाचे अनुभव कथन करत उपस्थिताच्या अंगावर शाहारे आणत आपल्या ग्रामीण बोली भाषेने विनोदांनी मांडणी करत सर्वांना खळखळून हसवले.

      कार्यक्रमाचे अध्यक्ष लोणी खु प्रथम लोकनियुक्त सरपंच श्री जर्नादन एकनाथ घोगरे आपल्या मनोगतात म्हणाले की लिट्ल फ्लॉवर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गौरवशाली भारताचा इतिहास उत्कृष्टरित्या सादर केला. लिट्ल फ्लॉवर स्कूलने अनोख्या पद्धतीने सदर करणारी लोणी पंचक्रोशीतील ही पहिलीच शाळा असेल असे गौरव उद्‌गार ही काढले.संस्थेचे विद्यमान चेअरमन ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ अशोक विखे पाटील हे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी दाखवलेल्या समाज कल्याणाच्या मार्गाने वाटचाल करीत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सीबीएसई माध्यमात जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान कु श्रावणी कुरकुटे हिने पटकावला.याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला .

        संस्थेचे विद्यमान चेअरमन ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ अशोक विखे पाटील सचिव नंदिनी अशोक विखे पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व प्राचार्य स्वाती खर्डे त्यांच्या नेतृत्वखाली शाळेतील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.