शिवप्रहार न्यूज- प्रवरा नदीत दोघांचे मृतदेह आढळले !

प्रवरा नदीत दोघांचे मृतदेह आढळले !
संगमनेर ( शिवप्रहार न्युज ) -आज शुक्रवारी सकाळी संगमनेर परिसरात नाशिक पुलाजवळ प्रवरा नदी पात्रात दोन इसमांचे मृतदेह आढळून आले.या घटनेमुळे पहाणाऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली . पोलीसांनी घटना स्थळी धाव घेतली.पाण्यातून मृतदेह दोरीने बांधून बाहेर काढण्यात आले. ते रुग्णवाहिकेतून नेण्यात आले.
प्रवरा नदीच्या पुला जवळ एक दुचाकी मिळून आली हे इसम कोण ? ते नदीत कसे गेले ? घातपात आहे का ? आत्महत्या ? याचा पोलीस शोध घेत असून सकाळी ११ पर्यत दोघांची ओळख पटली नव्हती.अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. या घटनेने संगमनेरात चर्चेला उधाण आले आहे.