शिवप्रहार न्यूज- श्रीमंत व्यापारी बांधवासाठी बंद ठेवला जातो तर मग एका गरीब हिंदू भगिनीसाठी उद्या बंद का नाही ठेवायचा- शिवप्रहार प्रतिष्ठान...

श्रीमंत व्यापारी बांधवासाठी बंद ठेवला जातो तर मग एका गरीब हिंदू भगिनीसाठी उद्या बंद का नाही ठेवायचा- शिवप्रहार प्रतिष्ठान...
श्रीरामपूर - बेलापूर गावातील एका दुर्दैवी घटनेमध्ये श्रीमंत व्यापारी बांधवासाठी बेलापूर गाव तीन दिवस बंद ठेवले जाते व श्रीरामपूर शहर देखील बंद ठेवले जाते. तर एका गरीब कुटुंबातल्या हिंदू मुलीसाठी उद्या सोमवारी श्रीरामपूर शहर व बेलापूर गाव का बंद ठेवले जाऊ नये ? असा सवाल शिवप्रहार प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे.
बेलापूर गावातील एका चौदा वर्षीय अल्पवयीन हिंदू मुलीसोबत लव्ह जिहादचा प्रकार झालेला असून गेल्या 25 दिवसांपासून ही हिंदू अल्पवयीन मुलगी पोलिसांना मिळून आलेली नाही.तरी पोलिस यंत्रणेने तात्काळ या हिंदू मुलीचा शोध घेऊन तिला तिच्या कुटुंबीयांच्या हाती द्यावे. यासाठी उद्या सोमवारी श्रीरामपूर शहर व बेलापूर गाव बंद ठेवण्यात येणार आहे.
जसे काही महिन्यापूर्वी श्रीमंत व्यापारी बांधवासाठी बेलापूर व श्रीरामपूर शहर बंद ठेवण्यात आले होते. तसेच लव्ह जिहाद सारख्या गंभीर प्रकारात अडकलेल्या एका गरीब हिंदू मुलीसाठी आपल्याला उद्या १६ ॲागस्ट सोमवारी श्रीरामपूर शहर व बेलापूर गाव एका दिवसासाठी बंद ठेवायचे आहे.
तरी सर्व व्यापारी व व्यवसायिक बांधवांना विनंती आहे की या हिंदु मुलीवर जी वेळ आलेली आहे. तशी लव्ह जिहादची वेळ कोणाच्याही कुटुंबातल्या मुलीवर येऊ शकते.
म्हणून हिंदूंच्या भावनांचा आदर ठेवून सर्व बांधवांनी उद्या सोमवारी श्रीरामपूर शहर व बेलापूर गाव बंद ठेवावे.नाहीतर हिंदू समाजाच्या भावनांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.