शिवप्रहार न्यूज- आज श्रीरामपुरात गावठी कट्ट्यासह एकाला पकडले...

शिवप्रहार न्यूज- आज श्रीरामपुरात गावठी कट्ट्यासह एकाला पकडले...

आज श्रीरामपुरात गावठी कट्ट्यासह एकाला पकडले...

श्रीरामपूर- श्रीरामपूर शहर पोलिसांनी आज शहरात गावठी कट्ट्यासह एकाला अटक केली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 248/2021 आर्म ॲक्ट3,5,7/25 या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

         याबाबतची हकीकत अशी की,आरोपी बळीराम उर्फ बल्ली यादव वय.30 रा. सरस्वती कॉलनी ,वार्ड नंबर 7,श्रीरामपूर हा रुपये 25000 च्या गावठी कट्ट्यासह दि 04/5/2021 रोजी 04.55 वा.हुसेन नगर ,जगताप मळा ,वार्ड नंबर 01, श्रीरामपूर या ठिकाणी श्रीरामपूर पोलीसांना मिळुन आल्याने पोलीसांनी त्याला शिकाफीने पकडुन वरीलप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. 

                  या गुन्ह्याचा तपास. पो. हे.का.श्री.जोसेफ साळवे हे पो.नि.श्री.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

श्रीरामपूर पोलिसांनी केलेली कारवाई एसपी.श्री.मनोज पाटील, ॲडिशनल एस पी सौ.काळे, डीवायएसपी.श्री.मिटके, पोलीस निरीक्षक श्री. संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय श्री.पाटील, पोहेका.जोसेफ साळवे, पोना.करमल,

पोका.किशोर जाधव, पोका.राहुल नरवडे, पोका.राहुल गायकवाड, पोका.पंकज गोसावी यांनी केली आहे.