शिवप्रहार न्यूज- निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुंड टोळ्यांना एसपी साहेबांचा सिंघमस्टाइल मोक्क्याचा दणका…

शिवप्रहार न्यूज- निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुंड टोळ्यांना एसपी साहेबांचा सिंघमस्टाइल मोक्क्याचा दणका…

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुंड टोळ्यांना एसपी साहेबांचा सिंघमस्टाइल मोक्क्याचा दणका…

नगर - नगर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.मनोज पाटील यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी विविध गुन्हेगारांची माहिती संकलित करून ज्या संघटित गुन्हेगारी टोळ्या आहेत. त्यांच्याविरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्याची संकेत दिले होते.

         त्या अनुषंगाने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 669/2021 या दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी रामसिंग त्रिंबक भोसले, वय 30,राहणार -सलाबतपुर ,तालुका नेवासा,जिल्हा-नगर व त्याच्या टोळीतील अकरा सदस्यांविरुद्ध मोक्याचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी.जी.शेखर पाटील,नाशिक परिक्षेत्र यांनी मंजूर केला आहे. या टोळी विरोधात नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर, श्रीरामपूर तालुका,नेवासा,सोनई,शिर्डी,शनिशिंगणापूर इत्यादी पोलिस ठाण्यात वीस संघटित स्वरूपात केलेले गंभीर गुन्हे दाखल आहेत.

      वरील प्रमाणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या टोळींविरुद्ध आगामी काळात मोक्का कायद्यान्वये कारवाई करणार असल्याचे संकेत एसपींनी दिले आहे.