शिवप्रहार न्युज - संतोषने केला महिलेचा विनयभंग ;गिन्नी गवतात नेण्याचा प्रयत्न...

संतोषने केला महिलेचा विनयभंग ;गिन्नी गवतात नेण्याचा प्रयत्न...
राहुरी - राहुरी तालुक्यातील कुक्कडवेडे येथे राहणारा आरोपी संतोष तबाजी जगदाळे याने शेतामध्ये टरबूज/कलिंगड तोडणाऱ्या पीडित महिलेजवळ येऊन, अश्लील भाषेत तिच्याशी संवाद करून,तिचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन आरोपी संतोषने केले.
तसेच आरोपीने तिला ओढत शेजारील वाढलेल्या गिन्नी गवताकडे नेण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी या पीडित महिलेने आरोपीच्या हाताला झटका देऊन सुटका केली.या प्रकरणी आरोपी संतोष जगदाळेच्या विरोधात राहुरी पोलिसात विनयभंग व इतर कलमांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.