शिवप्रहार न्युज - शेतकऱ्यांच्या कांद्यावर औषध मारुन नुकसान; तालुक्यातील दोघांवर गुन्हा...

शेतकऱ्यांच्या कांद्यावर औषध मारुन नुकसान; तालुक्यातील दोघांवर गुन्हा...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज) – श्रीरामपूरातील पढेगाव येथे शेतामध्ये असलेल्या कांदा पिकावर काहीतरी औषध मारून कांदा पिकाचे नुकसान केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्जुन सोपान बनकर यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत सुरेश बनकर व ऋषिकेश बनकर यांनी आमच्या कांद्याच्या पिकात काहीतरी औषध मारून,कांदा पिकाचे नुकसान केल्याचे म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. ढोकणे हे करत आहे.