शिवप्रहार न्यूज- कुरेशीच्या तक्रारीवरून शिवप्रहारचे मावळे व शिवभक्तांवर गुन्हा दाखल...

कुरेशीच्या तक्रारीवरून शिवप्रहारचे मावळे व शिवभक्तांवर गुन्हा दाखल...
बाजाठाण,वैजापूर - वैजापूर,छत्रपती संभाजीनगर येथील बाजाठाण पंचक्रोशीतील हमरापूर येथे गोमांस विक्री करणाऱ्या हबीब कुरेशी याला पकडून गावातील शिवभक्त व शिवप्रहारच्या मावळ्यांनी विरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले होते.दरम्यान त्या प्रकरणी कुरेशी याच्यावर काही दिवसांपूर्वी गुन्हा देखील दाखल झाला होता.
परंतु हबीब कुरेशी याने देखील गोसेवकांच्या विरोधात पोलीसांत फिर्याद दिली असून त्यामध्ये पंचक्रोशीतील शिवभक्त व शिवप्रहारचा मावळ्यांवर मारहाणीचा व शिवीगाळ केल्याचा आरोप कुरेशीने केला आहे.याप्रकरणी एकूण २० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.ज्यामध्ये शिवप्रहार संघटनेचे मावळे व गावातील शिवभक्त सर्वश्री.शरद चौधरी,प्रवीण भोसले, दीपक भराडे, निलेश तोडमल,पवन भराडे,ज्ञानेश्वर भराडे, अशोक गायके, शिवा दळे,बाबासाहेब भराडे व इतर 11 जण यांचा समावेश आहे.
गोवंश व गोहत्या बंदीचा महाराष्ट्रात कायदा असतांना देखील गोहत्या करून गोमांसची विक्री करणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई होण्याऐवजी अशा प्रवृत्तींना रोखणारे कट्टर शिवभक्त,गोसेवकांवर कारवाई होणे दुर्दैवी असल्याचे संतप्त मत परिसरातील हिंदू समाजाने व्यक्त केले आहे.