शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात नवऱ्याने बायकोचा मोबाईल पळवला; ॲसिड टाकण्याचीही धमकी...

श्रीरामपुरात नवऱ्याने बायकोचा मोबाईल पळवला; ॲसिड टाकण्याचीही धमकी...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोडवरील बुलेटच्या शोरूममध्ये काम करत असताना विवाहीत तरूणीचा शोरूममध्ये घुसून मोबाईल हिसकावून नेत पत्नीला अंगावर ॲसिड टाकण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पूनम कृष्णा कदम, व्यवसाय-खासगी नोकरी, रा.सूतगिरणी, दुर्गानगर, श्रीरामपूर ही विवाहीत तरूणी शहरातील वॉर्ड नं. ४ मधील संगमनेररोडवरील बुलेट शोरूममध्ये दुपारी १.३० वा. काम करत असताना तेथे पूनम हिचा नवरा कृष्णा धोंडीराम कदम, रा. जेऊर बायजाबाई, ता.अहिल्यानगर हा आला व त्याने पूनम हिच्याकडील व्हिवो कंपनीचा लाल रंगाचा मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतला.तसेच जाताना 'तू मला पुन्हा दिसली तर तुझ्या अंगावर ॲसिड टाकील', अशी धमकी देवून तेथून पळून गेला.
या प्रकरणी पूनम कदम या तरूणीने श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून काल सायंकाळी तिचा नवरा कृष्णा धोंडीराम कदम याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोना.शिंदे हे करीत आहेत.