शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर शहरातील बजरंगनगरच्या रिद्धी अग्रवालची मुंबई पोलीसमध्ये निवड…

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपूर शहरातील बजरंगनगरच्या रिद्धी अग्रवालची मुंबई पोलीसमध्ये निवड…

श्रीरामपूर शहरातील बजरंगनगरच्या रिद्धी अग्रवालची मुंबई पोलीसमध्ये निवड…

श्रीरामपूर -श्रीरामपूर शहरातील बेलापूररोड,बजरंगनगर भागातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर रोड गल्लीमध्ये राहणाऱ्या रिद्धी दिनेश अग्रवाल हिची मुंबई कारागृह पोलीस यामध्ये काल रोजी आलेल्या निकालात निवड करण्यात आली आहे.रिद्धी अग्रवाल ही शालेय जीवनामध्ये एनसीसीची कॅडेट होती.एनसीसीचे “सी”सर्टिफिकेट तिने धारण केलेले आहे.त्याचा फायदा तिला पोलीसमध्ये भरती होण्यासाठी झाल्याचे सांगितले. 

        या यशामध्ये तिच्या परिवारातील सदस्यांनी विशेषत: रिद्धीच्या आईने तिला चांगली साथ दिल्याचे तिने सांगितले.रिद्धी दिनेश अग्रवालच्या या निवडीबद्दल तिच्या परिवारातील सदस्य,विविध क्षेत्रातील मान्यवर,बजरंगनगर भागातील नागरिकांसह शिवप्रहारप्रमुख माजी पोलीस अधिकारी सुरजभाई आगे तसेच बेलापूर रोड मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा शिवप्रहारचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर (चंदू) आगे यांनी अभिनंदन केले.