शिवप्रहार न्युज - राजकीय द्वेषातुन महिलेच्या मदतीने खंडणी घेणे प्रकरणी गुन्हयातील पाहिजे आरोपी पुणे येथुन जेरबंद …

राजकीय द्वेषातुन महिलेच्या मदतीने खंडणी घेणे प्रकरणी गुन्हयातील पाहिजे आरोपी पुणे येथुन जेरबंद …
लोणी/शिर्डी - नमूद बातमीची हकिगत अशी की, दिनांक 12/08/2023 रोजी यातील फिर्यादी श्री.शरद बाबासाहेब आहेर रा.लोणी, ता.राहाता यांना त्यांचेच गावातील रणजीत उत्तम आहेर व श्रीकांत तान्हाजी मापारी यांनी गावचे राजकारणाच्या वादातुन एका महिलेच्या मदतीने पाच लाख रूपयाची खंडणी घेऊन,राजकारणातुन संपविण्याची धमकी दिलेबाबत लोणी पोलीस स्टेशन गुरनं 470/2023 भादंवि कलम 388, 389, 120 (ब), 506 प्रमाणे गुन्हा दाखल होता.
वर नमूद गुन्हयातील आरोपी नामे श्रीकांत तान्हाजी मापारी, रा.लोणी, ता.राहाता याचा मा.अति.सत्र न्यायाधीश, राहाता न्यायालयाने जामीन रद्द केलेला होता.जामीन रद्द केलेपासुन आरोपी हा फरार झालेला होता.मा.पोलीस अधिक्षक अहिल्यानगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना जिल्हयाचे अभिलेखावरील पाहिजे आरोपीचा शोध घेऊन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.त्यानुषंगाने पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांनी तपास पथकातील पोलीस अंमलदार विश्वास बेरड, विजय ठोंबरे, बाळासाहेब नागरगोजे, शिवाजी ढाकणे व प्रशांत राठोड अशांचे पथक तयार करुन गुन्ह्यातील पाहिजे आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.
दिनांक 04/02/2025 रोजी पथक वर नमूद गुन्हयातील निष्पन्न आरोपीचा तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे शोध घेत असताना आरोपी हा कोथरूड, पुणे येथे असलेबाबत माहिती प्राप्त झाली. प्राप्त माहितीच्या आधारे पथकाने कोथरूड पुणे येथे जाऊन संशयीत आरोपीचा शोध घेऊन, त्यास ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारले असता त्याने त्यांचे नाव 1)श्रीकांत तान्हाजी मापारी, रा.लोणी खुर्द, ता.राहाता, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले. ताब्यातील आरोपी हा लोणी पोलीस स्टेशन गुरनं 470/2023 या गुन्हयात पाहिजे आरोपी असल्याने त्यास पुढील तपासकामी लोणी पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर, मा. श्री. शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.