शिवप्रहार न्युज - “ड्रोन”वरुन गळनिंबला ०२ युवकांना वेगळ्याच भाषेत बोलणाऱ्यांकडून मारहाण…

“ड्रोन”वरुन गळनिंबला ०२ युवकांना वेगळ्याच भाषेत बोलणाऱ्यांकडून मारहाण…
गळनिंब (प्रतिनिधी) गावातील दोन युवक गळनिंब- ममदापूर रस्त्याने आपल्या दुचाकीवरून मित्राच्या घरी जात असताना चिंधे- पगारे वस्ती वरून पुढे गेले असता डोक्यावरून गार हवा येत असल्याने वरती पाहिले असता ड्रोनचे फॅनसह ड्रोन सुरू दिसले.त्या ड्रोनची त्यांनी पाहणी करण्याचा प्रयत्न केला असता शेजारील ऊसातून एक अज्ञात इसम याने त्या युवकांवर दगडफेक केली व धारदार स्टिक घेऊन समोर आला समोर येऊन हल्ला केला त्यातील एका युवकाच्या हातावर मारल्याने दुसऱ्या युवकाने त्याला मिठी मारून स्टिक ताब्यात घेऊन त्यास प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता सदरील इसमाने दुसऱ्या वेगळ्याच भाषेत संवाद साधत त्याच्या साथीदारांना आवाज दिल्याने ते आले असता दोन युवकांनी शेजारील वस्तीकडे धाव घेतली.
वस्तीवरील जमाव उसाच्या शेतीच्या दिशेने जाता सदरील अज्ञात इसमाने धूम ठोकली असे हल्ला झालेल्या दोन युवकांनी हकीगत सांगितल्याचे गळनिंब उक्कलगाव कुरणपूर येथील पाच - सहाशे युवक, ग्रामस्थ व लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस फौज फाट्यासह उसाचे शेत पिंजून काढले पण ते मिळून आले नाही. याबाबत प्रवरा पट्ट्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. तरी परिसरात वेगवेगळ्या अफेचे पेव सुटले असून सध्या सुरू असलेले ड्रोन आकाशात फिरणे यास कारणीभूत ठरत आहे.अशा दबक्या आवाजात परिसरात चर्चा आहे.गेल्या आठवड्यापासून गावातील नागरिक या ना त्या कारणामुळे भयभीत आहे.तसेच काल रात्री अचानक काही घरावर दगडफेक झाल्याने सकाळी नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली चर्चा आहे.
त्या घटनेवेळी ग्राम सुरक्षा यंत्रणेचा कॉल ग्रामसेविकेच्या आडमुठेपणामुळे होऊ शकला नाही.गेली दीड महिन्यापासून ग्राम सुरक्षा यंत्रणेचे बिल अदा करा म्हणून सांगितले असता ग्रामसेविकेने ऑनलाईन दिसत नसल्याचे कारण सांगून अद्यापही बिल भरले नाही. ग्राम सुरक्षा यंत्रणाचा कॉल झाला असता तर सदर अज्ञात इसम मिळून आले असते असे संदीप शेरमाळे, सामाजिक कार्यकर्ते यांनी म्हटले आहे.