शिवप्रहार न्युज - दारूसाठी पैसे न दिल्याने भावाच्या डोक्यात कुऱ्हाड; मारणारा भाऊ अटकेत…

दारूसाठी पैसे न दिल्याने भावाच्या डोक्यात कुऱ्हाड; मारणारा भाऊ अटकेत…
नगर ( शिव प्रहार न्यूज ) दारूचे व्यसन किती भयानक असते याचे अनेक किसे आपण ऐकतो.असाच एक किस्सा नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंडी परिसरात काल घडला.या ठिकाणी अविनाश काळे,वय (३०) हा तरुण त्याच्या घरात जेवण करत असताना त्याचा सख्खा भाऊ कैलास काळे हा घरात आला व अविनाश काळे याला म्हणाला की,”तू मला दारूसाठी पैसे का देत नाही “ असे म्हणत हातातील कुऱ्हाड कैलास याने भाऊ अविनाश याच्या डोक्यात मारून जबर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अविनाशला दवाखान्यात नेण्यात आले.
अविनाशने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी भाऊ कैलास काळे याच्याविरुद्ध भादंवि कलम 326, 506,504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल लोखंडे हे पुढील तपास करीत आहे.
पोलिसांनी आरोपी कैलास काळे याला तातडीने अटक केली आहे.दारूसाठी भावाने भावाच्या डोक्यात कुऱ्हाड घातल्याने परिसरात तो चर्चेचा विषय ठरला आहे .