शिवप्रहार न्यूज - कोयत्याने धमकी देऊन बलात्कार; जातीवाचक शिवीगाळ ! नगरमध्ये 900 किलो गोमांस पकडले !! 

शिवप्रहार न्यूज - कोयत्याने धमकी देऊन बलात्कार; जातीवाचक शिवीगाळ ! नगरमध्ये 900 किलो गोमांस पकडले !! 

कोयत्याने धमकी देऊन बलात्कार; जातीवाचक शिवीगाळ ! नगरमध्ये 900 किलो गोमांस पकडले !! 

नगर (शिवप्रहार न्यूज)- नगर शहरात राहणाऱ्या एका 31 वर्षे वयाच्या तरुणीला तिच्या बहिणीच्या घरी असताना आरोपी साहिल मोहम्मद शाकीर राहणार-मुकुंदनगर, नगर याने तरुणीला कोयत्याने मारण्याची धमकी देऊन, धाक दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने बलात्कार करून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला याप्रकरणी काल भिंगार पोलिसांत पिडीतेने फिर्याद दिल्यावर आरोपी साहिल मोहम्मद शाकीर याच्याविरुद्ध भादवि कलम 376, 377, 504, 506 सह ॲट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी साहील पिडीत महिलेला तुम्हारी लायकी नही ! असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिली. याप्रकरणी डीवायएसपी.कातकाडे हे पुढील तपास करीत आहे.

  दुसऱ्या घटनेत नगर शहरात कोतवाली पोलिसांनी रात्रीच्या वेळी एक पिकप गाडी पकडली त्यात गोवंश जनावरांची कत्तल केलेले तब्बल 900 किलो गोमांस मिळून आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर मिसाळ यांच्या फिर्यादीवरून आरोपी असमद गफूर शेख वय-32, राहणार- कबाड गल्ली, नगर, आयान जाकिर कुरेशी वय-19, राहणार-झेंडीगेट, नगर, मोहम्मद गौस उर्फ शाहरुख फकीरमोहमद कुरेशी राहणार-झेंडीगेट, नगर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी रक्षा अधिनियम 1995 चे सुधारित सन 2015 चे कायदा कलम ५ क ९-अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई कचरे हे पुढील तपास करीत आहे.