शिवप्रहार न्यूज- जोडप्यास लुटणारे राहुरीचे तिघे पकडले ? श्रीरामपूरच्या तरुणाला चॉपर मारून लुटले !!

जोडप्यास लुटणारे राहुरीचे तिघे पकडले ? श्रीरामपूरच्या तरुणाला चॉपर मारून लुटले !!
नगर /लोणी (शिवप्रहार न्यूज ) प्रतिनिधी - नगर मनमाड रस्त्यावर देहरे गावच्या शिवारात राजस्थान हॉटेल जवळ काल रात्री सौ.घोरपडे व त्यांचे पती रवींद्र घोरपडे ,दोघे राहणार- असतगाव ,तालुका राहता हे दोघे दुचाकीतील हवा तपासण्यासाठी थांबले असता अचान पणे दोन दुचाकी वर चौघेजण आले व त्यांनी रवींद्र घोरपडे यांना बेदम मारहाण करून महिलेला हात पिरगळून चाकूचा धाक दाखवून 5000 ची रोकड लुटून नेली.
या घटनेची खबर मिळताच डी वाय एस पी कातकाडे ,एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सपोनि आठरे यांनी तातडीने घटनास्थळी भेट घेतली तपास तातडीने करत या प्रकरणी खैरणार ,चव्हाण ,सिनारे, तिघे -राहणार मोमीन आखाडा, राहुरी यांना पोलिसांनी पकडल्याची माहिती समजली असून सौ घोरपडे या विवाहित तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध भादवी कलम 394 ,34 आर्म अक्ट 4 -25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान दुसऱ्या घटनेत पुणतांबा-श्रीरामपूर रस्त्यावर राहता तालुका हद्दीत आदित्य पेट्रोल पंपाजवळ दुचाकी वरून श्रीरामपूर कडे येत असलेला श्रीरामपूरचा तरुण शुभम शांतीलाल चोरडिया ,वय 26 याला पाठीमागून दुचाकी वर आलेल्या तीन जणांनी चॉपर डोक्यात मारून जखमी करून त्याच्या जवळील 15000 रोख रक्कम अठरा हजाराचा मोबाईल लुटून नेला .
घटनास्थळी पोनि गायकवाड व पोसई चौधरी यांनी भेट दिली राहता पोलिसात चोरडिया यांच्या फिर्यादीवरून तिघा अज्ञात आरोपीं विरुद्ध भादवी कलम 394,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला .पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहे . पुणतांबा -श्रीरामपूर रस्त्यावर लुटीचे प्रकार वाढले आहे असे नागरिकांनी सांगितले .