शिवप्रहार न्युज - PWD बेलापूररोडवर खांब हटवायला माणसाचा बळी जायची वाट पाहणार का ??
PWD बेलापूररोडवर खांब हटवायला माणसाचा बळी जायची वाट पाहणार का ??
श्रीरामपूर- श्रीरामपूर- बेलापूर रोडवर गेल्या आठवड्यात झालेल्या भीषण अपघातात एका तरुण व्यवसायिकाचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातात श्रीरामपूर- बेलापूर रोडवरील स्ट्रीट लाईट (रस्त्यावरचा खांब) तुटून पडलेला आहे.चार-पाच दिवसांपासून हा खांब तसाच रस्त्यात पडलेला असल्याने यामुळे दुसरा एखादा अपघात होऊन त्यात एखाद्या मोटरसायकल वाल्याचा बळी जाण्याची शक्यता आहे.आता पीडब्ल्यूडीवाले हा बळी जायची वाट पाहत आहे का ?? ते हा खांब कधी काढणार ?? याची प्रतीक्षा या रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांना आहे.
तसेच या भागात गाड्यांचे शोरूम,कपड्याचे मोठे दुकान असल्यामुळे त्यांची पार्किंग देखील रस्त्यावर येते.मालाचे कंटेनर रस्त्यावर लागतात.या दुकानात येण्यासाठी काहीजण उलटे (रॉंग साईड) प्रवास करतात.अपघाताला आमंत्रण देतात.सोबतच काहींनी अतिक्रमण करून पाट्या लावलेल्या असल्यामुळे वाहन चालकांचे लक्ष देखील विचलित होते.त्यातच या वडाच्या झाडाच्या जवळील रस्त्याची पट्टी छोटी असल्याने अपघात अजून वाढून अनेकांचे बळी जाऊ शकतात. म्हणून पीडब्ल्यूडी व शहर पोलिसांनी तात्काळ याच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
1
Funny
1
Angry
2
Sad
1
Wow
2