शिवप्रहार न्युज - ससाणे, चित्ते, फंड, छल्लारेंचे नगराध्यक्षपदाचे उमेदवारी अर्ज अवैध ...

Nov 19, 2025 - 12:55
 0  3.4k
शिवप्रहार न्युज  -  ससाणे, चित्ते, फंड, छल्लारेंचे नगराध्यक्षपदाचे उमेदवारी अर्ज अवैध ...

ससाणे, चित्ते, फंड, छल्लारेंचे नगराध्यक्षपदाचे उमेदवारी अर्ज अवैध ...

   श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज) – श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीत नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी एकूण १९ तर नगरसेवक पदासाठी २७४ अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी नगराध्यक्ष पदासाठीचे ०५ तर नगरसेवक पदासाठीचे ४० उमेदवारी अर्ज अवैध ठरले.

      नगराध्यक्ष पदासाठीचे संजय छल्लारे, राजश्री ससाणे, संजय फंड, दिपाली चित्ते (दोन अर्ज) असे एकूण पाच अर्ज अवैध ठरले आहेत.

     तर नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे करण ससाणे (दोन), भाजपचे श्रीनिवास बिहाणी, शिंदे सेनेचे प्रकाश चित्ते, ठाकरे सेनेचे अशोक थोरे (तीन) आदींसह निलेश भालेराव, जोएफ शेख, वसंत कोल्हे, आकाश शेंडे, निलोफर पटेल, चरण त्रिभुवन असे एकूण १४ अर्ज वैध ठरले आहेत.

What's Your Reaction?

Like Like 9
Dislike Dislike 0
Love Love 2
Funny Funny 7
Angry Angry 0
Sad Sad 2
Wow Wow 1